शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

कृषी व सेवा विस्ताराचा तयार होणार आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:00 IST

जिल्ह्याचा कृषी व संलग्न सेवेसाठी यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसोमवारी कार्यशाळा : १५ मे पर्यंत केले जाणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा कृषी व संलग्न सेवेसाठी यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा तयार केला जाणार आहे. सदर आराखडा पुढील पाच वर्षांसाठी राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यशाळेला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, मत्स्य व्यवसाय अधिकारी प्रशांत वैद्य, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.वंजारी, डॉ.बुरले, दुग्ध व्यवसाय अधिकारी सचिन यादव, रेशीम अधिकारी राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, चेतना लाटकर, बद्री, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भोसले, कृषी विकास अधिकारी कोडप, उपविभागीय कृषी अधिकारी पानसरे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे पाच झोन तयार करून १५ मे पर्यंत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावे, स्थानिक उपलब्धी व तंत्रज्ञानातील त्रूटी यांचा मेळ घालावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. डॉॅ.प्रकाश पवार यांनी यथार्थदर्शी संशोधन आणि विस्तार आराखड्याचे स्वरूप, संकल्पना व पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रास सहाय्यभूत ठरेल, अशा कृषी, पशुधन, रेशीम, मत्स्य व्यवसाय, विपनन आदींचा समावेश असलेला आराखडा मे २०१९ पर्यंत होणार आहे.