शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

तो खड्डा अजूनही ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:41 IST

कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या स्फोटानंतर पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. खड्ड्यावर टाकलेली गिट्टी व माती निघून जात असल्याने पुन्हा मोठा खड्डा पडत आहे.

ठळक मुद्देभूसुरूंग स्फोटाचे ठिकाण : लेंढारी नाल्यावरील खड्डा ; अनेक अपघात घडलेत

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या स्फोटानंतर पडलेल्या खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. खड्ड्यावर टाकलेली गिट्टी व माती निघून जात असल्याने पुन्हा मोठा खड्डा पडत आहे. सदर खड्डा रात्रीच्या सुमारास लक्षात येत नसल्याने वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.पुलाच्या खालच्या बाजूस नक्षल्यांनी भूसुरूंग लावला होता. भूसुरूंग स्फोटानंतर पूल व डांबरी रोड यांच्या दरम्यान पाच ते सहा फुटाचा खड्डा पडला. या खड्ड्यामुळे या मार्गावरील वाहतूक घटनेनंतर तीन दिवस बंद होती. बांधकाम विभागाने तीन दिवसानंतर सदर खड्ड्याची डागडुजी केली. मात्र दिवसेंदिवस खड्ड्यावर टाकलेली गिट्टी, माती व सिमेंट निघत आहे. त्यामुळे खड्डा पूर्ववत होत चालला आहे. कुरखेडा-पुराडा हा मुख्य मार्ग असल्याने रात्रंदिवस या ठिकाणावरून वाहनांची वाहतूक सुरू राहते. रात्रीच्या सुमारास सदर खड्डा लक्षात येत नाही. एकदम उंच डांबर आहे. त्यामुळे वाहन खड्ड्यात जाऊन डांबरवर चढताना वर उसळून अपघात होत आहे. विशेष करून रात्रीच्या सुमारास अपघात वाढले आहेत.२० मे रोजी याच खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात होऊन कुरखेडा येथील दिलीप संघेल यांचा मृत्यू झाला. तर मैनाबाई पुडो ही गंभीररित्या जखमी झाली. पुन्हा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी खड्डा दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.