शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Nagar Panchayat Election : एटापल्लीत महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 17:57 IST

एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात ७४.०४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली.

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चालू वर्षी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एटापल्ली येथे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथ  संकल्पना राबविण्यात आली.

एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात ७४.०४ टक्के मतदान झाले. यात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथची संकल्पना राबवली गेली. यामध्ये समूह निवासी शाळा खोली क्रमांक २ येथे  पहिल्यांदाच सर्व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच बंदोबस्तासाठी महिलांची नेमणूक करण्यात आली. या उपक्रमात संपूर्ण बूथ, बुथचे प्रवेशद्वार तसेच लक्षवेधी सेल्फी पॉईंटसाठी गुलाबी रंगाचा कपडा, गुलाब फुगे व साहित्य वापरण्यात आले होते. महिला स्टाफ यांनीदेखील गुलाबी पोषाखातच आपले कर्तव्य पार पाडले.

एटापल्ली येथे ७४.०४ मतदान

एटापल्ली शहरात जिल्हा परीषद व समुह निवासी शाळेत ११ बूथ व जिवनगट्टा जिल्हा परीषद शाळेत ३ बूथ तसेच कृष्णार व मरपल्ली येथील जिल्हा परीषद शाळेत प्रत्येकी १ - १ बूथ अशा १६ मतदान केंद्रावर २३५८  महिला व २३७१ पुरुष असे एकूण ४७२९ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. १६ मध्ये ८९.८४ टक्के झाले. तर प्रभाग क्र. ४ मध्ये सर्वांत कमी ४७.६८ टक्के मतदान झाले.

नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी चोख बंदोबस्त कर्तव्य पार पाडले. या अनोख्या उपक्रमाचे उमेदवार, मतदार व सामान्य नागरिक यांनी स्वागत केले तसेच या उपक्रमातून प्रथमच महिला सक्षमीकरणाबाबत निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच सकारात्मक संदेश देण्यात आला.

टॅग्स :ElectionनिवडणूकWomenमहिला