शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

अडपल्लीला खड्ड्यांचा विळखा

By admin | Updated: March 19, 2015 01:30 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोगावनजीकच्या अडपल्ली गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत.

गडचिरोली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोगावनजीकच्या अडपल्ली गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात गावातील अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. यासंदर्भात गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा रस्ता दुरूस्ती व नवीन रस्ता बांधकामाची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संपूर्ण अडपल्ली गावातील रस्त्यांना खड्ड्यांचा विळखा पडला आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अडपल्ली गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावातील काही नागरिक रस्त्याच्या कडेला शेणखताचे खड्डे खोदून त्या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे अर्ध्याअधिक मार्गावर शेणखताचे ढिगारे पसरलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गडचिरोलीवरून अडपल्लीला जाणाऱ्या वाहनधारकांना व सायकलस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राम पंचायत प्रशासनाचा पंचायत समिती, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा कमी पडत असल्यामुळे अडपल्ली गाव विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)