शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या प्रवेशद्वारासमाेरच कचऱ्याचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

वैरागड गावातील प्रमुख रस्त्यांपैकी करपडा हा एक रस्ता आहे. महात्मा जाेतिबा फुले चौक ते आदिशक्ती माता मंदिराकडे व पुढे ...

वैरागड गावातील प्रमुख रस्त्यांपैकी करपडा हा एक रस्ता आहे. महात्मा जाेतिबा फुले चौक ते आदिशक्ती माता मंदिराकडे व पुढे विहीरगाव घाटाकडे जाणारा हा रस्ता असून, येथून नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला परिसरातील नागरिक आपल्या घरातील केरकचरा आणून टाकत असल्याने, शाळेसमोरच ढीग तयार झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा कचरा इकडे तिकडे पसरून त्या ठिकाणी घाण तयार झाली आहे. सध्या या मार्गाने ये-जा करणे कठीण झाले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम पडू शकतो. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग त्याच ठिकाणी ठिकाणी विद्युत राेहित्र आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी याच ढिगावर उभे राहून विद्युत दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे अंकुर आश्रमशाळेतील कर्मचारी व परिसरातील नागरिकांना हाेणारा त्रास लक्षात घेऊन कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

गाळ उपशावर खर्च, मात्र कचऱ्याकडे दुर्लक्ष

अंकुर आश्रमशाळेसमाेर कचरा टाकण्यावर प्रतिबंध घालावा, तसेच जमा झालेल्या कचऱ्याची उन्हाळ्यातच विल्हेवाट लावावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती, परंतु लाखो रुपये खर्च दाखवून नाल्या स्वच्छ करणाऱ्या ग्रामपंचायतीने कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावली नाही. गाळ उपशावर लाखाे रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु कचऱ्याचे ढीग कायम आहे. ढिगाच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास हाेत आहे.

230721\4406img_20210722_165111.jpg

शाळेसमोरील कचर्‍याचा ढीग