उमाजी लाळे ६० रा.बाह्मणी जि.गडचिरोली असे जखमीचे नाव आहे. चप्पल विक्रीचे दुकान लावण्यासाठी बाह्मणी येथील रहिवासी असलेले मुलगा व वडील आपल्या पिकअप वाहनाने धानोरा येथील आठवडी बाजारात आले होते. बाजार आटोपून त्याच वाहनाने सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मुलगा व वडील आपल्या गावी जाण्यास निघाले. मुलगा गाडी चालवत होता, तर वडील बाजूला बसले होते. काकडवेली येथे पंक्चर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे चालकास उभा ट्रक न दिसल्याने ट्रकला धडक बसली. यामध्ये पिकअपमधील उमाजी यांच्या डोक्याला गंभीर दुखपत झाली. मागून येणारे बाजार दुकानातील वाहनाने त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथे रेफर करण्यात आले, परंतु तेथेही नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी त्याला ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पिकअप वाहनाची उभ्या ट्रकला धडक, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:45 IST