शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

ऐतिहासिक स्थळांचे ‘दर्शन’

By admin | Updated: July 7, 2014 23:35 IST

राज्यात मागास आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या तसेच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित

गडचिरोली : राज्यात मागास आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या तसेच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र दर्शन सहल’ या अभिनव उपक्रमातून प्रगत महाराष्ट्राचे दर्शन घडले. सहलीत विद्यार्थ्यांनी राज्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.२५ जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना तसेच राज्यातील या ठिकाणी झालेली विविध विकास कामांना भेटी दिल्या. या सहलीमध्ये ३८ मुले व ४१ मुली अशा एकूण ७९ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विशेष करून या सहलीमध्ये नक्षल सदस्यांची नातेवाईक असलेली मुले व नक्षल्यांकडून मारल्या गेलेल्या परिवारातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधान भवन, मंत्रालय, गृहमंत्र्यांचे कार्यालय, गेट वे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, नेहरू तारांगण, गिरगाव चौपाटी, वांद्र्रे-वरळी सी-लिंक, हाजी अली दर्गा येथे भेटी दिल्या. तसेच मुंबई येथे नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेने वर्सोवा ते अंधेरी दरम्यान प्रवास केला. पुणे भेटी दरम्यान कात्रज सर्पोद्यान, सारसबाग, शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड, खडकवासला, आयटी पार्क मधील इन्फोसिस कंपनीला भेट दिली. औरंगाबाद येथे पानचक्की, बिवी का मकबरा, देवगिरी, म्हैसमाळ, अजिंठा-वेरूळ लेणी, नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आकाशवाणी केंद्र्र, डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान केंद्र, चिल्ड्रेन ट्राफीक पार्क, क्रेझी केसल वॉटर पार्क या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर पाडून पर्यटनाचा आनंद लुुटला. नागपूर येथील अपारंपरिक प्रशिक्षण अभियान केंद्रात सहलीचा समारोप झाला. (शहर प्रतिनिधी)