शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पेट्रोलने केली नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:20 IST

मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे.

ठळक मुद्देमंगळवारी गाठला उच्चांक : डिझेल ७७ रूपयांच्या वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे.केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलवरील अनुदान पूर्णपणे बंद करून किमतीवरील नियंत्रण सुध्दा हटविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात येणाऱ्या चढाव-उतारानुसार दररोज किंमती बदलत आहेत. मागील १५ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी ८६ रूपयांच्या जवळपास असलेल्या पेट्रोलने मंगळवारी नव्वदी पार केली. गडचिरोलीसह जिल्हाभरातील सर्वच पेट्रोलपंपावर पेट्रोल ९० रूपयांपेक्षा अधिक दराने विकला जात होता. दरदिवशी वाढणाºया पेट्रोलच्या किमतीमुळे वाहनधारक चांगलेच अडचणीत आले आहेत. वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीबाबत व्हॉटस्अ‍ॅप व इतर सोशलमीडियावर गमतीदार व्हिडीओ, फोटो, मेसेज फिरत आहेत. महागाईमुळे आधीच होरपडून निघालेल्या जनतेची आणखी हाल होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात ट्रॅक्टरची संख्या अधिक आहे. डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करून ट्रॅक्टरच्या भाड्यात वाढ केली जात आहे.मुलचेरातील मेडिकलमध्ये सुध्दा मिळते पेट्रोलपेट्रोलपंप नसलेला मुलचेरा हा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव तालुका असावा, असा अंदाज आहे. पेट्रोल नसल्याने अवैध पेट्रोल विक्रेत्यांचे धंदे जोमात सुरू आहेत. किराणा दुकानाबरोबरच येथील मेडिकल मध्ये सुध्दा पेट्रोलची विक्री केली जाते. अवैध पेट्रोल विक्रेते मुलचेरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आष्टी येथून दर दिवशी कॅनच्या सहाय्याने पेट्रोल सकाळीच पेट्रोल आणतात. सदर पेट्रोल १०० रूपये दराने विकल्या जातो. मुलचेरा येथे पेट्रोलपंप असणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पाठपुरावा होत नसल्याने पेट्रोल पंपाची मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. परिणामी वाहनधारकांना नायलाजास्तव अधिकची किमत देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल