शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

किडीच्या प्रादुर्भावाने पछाडले

By admin | Updated: September 27, 2015 00:59 IST

धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

शेतकरी संकटात : धान, सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव; हाताशी आलेले पीक गेलेगडचिरोली : धान, सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली असून हाताशी आलेले पीक आता हातून जाण्याच्या विवंचनेने बळीराजा त्रस्त झाला आहे. यंदा पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्याने कशीतरी रोवणी केली होती. परंतु धानपीक आता किडीमुळे पूर्णत: नष्ट झाले आहे. काही ठिकाणी पिकांमध्ये गुरांना चरण्यासाठी सोडून दिले आहे.जिल्ह्याच्या वडसा तालुक्यांमध्ये सावंगी, कोंढाळा, उसेगाव, तुळशी, विसोरा, शंकरपूर, कोकडी, फरीझरी, एकलपूर, चोप कोरेगाव, धानोरा तालुक्यातील चातगाव, कन्हाळगाव, खुर्सा, गिलगाव, बेडगाव, मुरमाडी, मुरूमबोडी, रांगी, मोहली, खेडी, सोडे, लेखामेंढा, पांढरसडा, दुधमाळा, आरमोरी तालुक्यातील कासवी, वैरागड, ठाणेगाव, सुकाळा, मोहझरी, शिवणी, मेंढेबोडी, करपळा, सिर्सी, देऊळगाव, शेगाव, डोंगरगाव, लोहारा, कोजबी, गणेशपूर, पेवठी (नवरगाव), इंजेवारी, गडचिरोली तालुक्यात अडपल्ली, गोगाव, माहदवाडी, कुराडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमगाव टोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा या भागासह दक्षिण व उत्तर गडचिरोली भागातील अनेक तालुक्यांमध्ये धानावर गादमाशी, खोडकीडा, करपा, लष्करीअळी, पाने गुंडाळणारी अळी, बेरडी, कडाकरपा या रोगांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाअभावी आधीच विलंबाने झालेली धानाची रोवणी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात किडीचा झालेला प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. किड नियंत्रणासाठी शेतकरी पिकावर फवारणी करीत असले तरी त्याचा प्रभाव दिसूनच येत नाही, अशी माहिती या भागाचा दौरा करून आलेल्या लोकमत चमुला अनेक शेतकऱ्यांनी बोलताना दिली. यंदा विलंबाने आलेला पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती होतीच परंतु त्यातही हाताशी आलेले पीक आता जात असल्याने शेतकऱ्याची स्थिती आता मोडण्याच्याच अवस्थेत असल्याचे आरमोरी, वडसा, धानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाचे अधिकारी आमच्या गावाकडे येऊन गेले. त्यांनी पिकांची पाहणी केली. परंतु त्यानंतर सांगितलेले उपाय केल्यानंतरही किड कमी झाली नाही, अशी माहिती शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. वडसा, आरमोरी तालुक्यात का आली कीड?वडसा, आरमोरी तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी वापरून उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. उन्हाळी धानाचे पीक साधारणत: मे, जून महिन्यात काढणीला काढण्यात आले. त्यानंतर लगेचच खरीप हंगामासाठी मशागत सुरू झाली. या कालावधीत बांधीमध्ये पाणी असल्याने गवत व जुन्या धानाची देठ कायम होती. त्यामुळे प्रमुख किडीचा जीवनक्रम सतत चालू राहील. परिणामी खरीप हंगामामध्ये किडीच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण तयार होऊन या भागात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे एक प्रमुख कारण असल्याचे सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सुधीर बोरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उशिरा रोवणीमुळे बेरडीचे आक्रमणगडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. उशिरा धानाची लागवड झाली. धानपीकाची रोवणी जेवढी उशीरा व धान रोवणीला लागणाऱ्या पऱ्ह्यांचा कालावधी जर ५० ते ६० दिवसांचा असेल तर अशा ठिकाणी हमखास बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. हीच परिस्थिती यंदा गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यामुळे बेरडीचेही प्रचंड आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे.