धर्मनिहाय जनगणना : मुस्लीम व ख्रिश्चन लोकसंख्याही जिल्ह्यात वाढतीवरलोकमत विशेषअभिनय खोपडे गडचिरोलीसन २०११ मध्ये घेण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जारी केली. संपूर्ण देशाची आकडेवारी जाहीर झाली असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्याही आकडेवारीचा यात उल्लेख करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे शहरी व ग्रामीण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ असून यात हिंदूंचा टक्का वाढलेलाच आहे. जिल्ह्यात हिंदू नागरिकांची लोकसंख्या ९ लाख २७ हजार ७११ आहे. तर मुस्लीम लोकसंख्याही २१ हजार ६३ आहे. ख्रिश्चन लोकसंख्या ३ हजार ७०१, शिखांची ५७३ तर बौध्द लोकसंख्या ७३ हजार ९५५, जैन समाजाची लोकसंख्या ३२० व जात धर्माचा उल्लेख न करणाऱ्या नागरिकांची संख्या २९ हजार ८२४ वर आहे. गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ७२ हजार ९४२ लोकसंख्यपैकी ९ लाख ५४ हजार ९०९ लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी आहे. तर १ लाख १८ हजार ३३ लोकसंख्या ही शहरी भागात राहणारी आहे. या लोकसंख्येत ५ लाख ४१ हजार ३२८ पुरूष, ५ लाख ३१ हजार ६१४ महिला असून त्यातील ४ लाख ८१ हजार २९० पुरूष हे ग्रामीण तर ४ लाख ७३ हजार ६१९ महिला ग्रामीण भागात राहणाऱ्या आहे. ६० हजार ३८ पुरूष व ५७ हजार ९९५ महिला शहरी भागात राहणारे आहे.दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचे काम सुरू असताना विविध संघटना तसेच सामाजिक संस्थांनी नागरिकांना जातीचा उल्लेख करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर जनगणना प्रगणकाकडे जातीचा उल्लेख करून माहिती नागरिकांनी भरली. त्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने हा डाटा तयार केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात हिंदू लोकसंख्येसोबतच ख्रिश्चन, मुस्लीम समाजाची लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दुर्गम असलेल्या अनेक तालुक्यांमध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला असल्याचे या धर्मनिहाय जनगणनेवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात हिंदूंचा टक्का वाढलेलाच
By admin | Updated: August 28, 2015 00:07 IST