शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित

By admin | Updated: June 20, 2015 02:13 IST

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अहेरी : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी अनुदानित आश्रमशाळा संघटनेच्या वतीने अहेरीचे प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम अदा करणे अशक्य असल्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. सदर मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु वेतनाविना कर्मचाऱ्याची आर्थिक अडचण लक्षात घेता, पुन्हा वेतन निश्चिती व वसुली करणे अडचणीचे व अन्यायकारक असल्याने सुधारित एकस्तर वेतन निश्चिती प्रकरण निकाली लागेपर्यंत वेतन वसुली थांबविण्यात यावी व प्रलंबित वेतन तत्काळ अदा करावे, अशी मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनकर यांनी केली. प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी मागण्या लक्षात घेऊन वेतन देयके पूर्वीप्रमाणेच सादर करण्याची मुख्याध्यापकांना आदेशित करून प्रलंबित वेतन अदा करण्याचे मान्य केले. यावेळी प्रकल्प कार्यालय भामरागड येथील सहायक प्रकल्प अधिकारी विलास राचेलवार, लेखाधिकारी वाळूजकर, संघटनेचे विलास सोमनकर, सुधाकर शेंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांवर वेतन वसुलीचे गंडांतरआदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली, अहेरी व भामरागड येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना देय असलेल्या एकस्तर वेतनश्रेणी व गे्रड वेतनात एकसूत्रता नसल्याने कर्मचारी कमी अधिक प्रमाणात वेतनाची उचल करीत आहेत. आश्रमशाळेतील शिक्षकांना मागील दोन वर्षांपूर्वी सुधारित एकस्तर वेतनश्रेणी व गे्रड वेतन लागू करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांनी जवळपास चार ते पाच लाख रूपयांचा अतिरिक्त रकमेची उचल केली. कालांतराने लागू केलेली सुधारित एकस्तर वेतनश्रेणी ही सदोष असल्याचे प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने शिक्षकांनी उचल केलेल्या पूर्ण रकमेची वसुली झाल्याशिवाय व पूर्ववत एकस्तर वेतन निश्चिती केल्याशिवाय वेतन देता येणार नाही, असे प्रकल्पाच्या वतीने आदेशित करण्यात आले. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे.