शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाच्या कारणावरून मारहाण करणाऱ्यांना शिक्षा

By admin | Updated: July 15, 2016 01:45 IST

जादूटोणाच्या संशयावरून मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या १० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

 वडधा येथील घटना : १० आरोपींना झाला कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल गडचिरोली : जादूटोणाच्या संशयावरून मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या १० आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर प्रत्येकावर २०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. वडधा येथील मंजुळाबाई बोंडकू मेश्राम हिने तिचा मुलगा गजानन हा जादूटोणामुळेच एक आठवड्यापासून आजारी आहे व जादूटोणा जनार्धन कावरे याने केला असल्याचा तिला गैरसमज झाला होता. ११ नोव्हेंबर २०११ रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक जनार्धनची पत्नी देवकाबाई व मृतक जनार्धन कावरे हे शेतावरून आले होते. त्याचवेळी मंजुळाबाईचा पुतन्या मोरेश्वर मेश्राम व धुंडेशिवणी येथील कालिदास कांबळे हे जनार्धनच्या घरासमोर येऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथाबुक्क्यांमुळे जनार्धन जखमी होऊन खाली कोसळला. पहाटेच्या सुमारास जनार्धन त्याच ठिकाणी मृतावस्थेत पडून होता. याबाबतची तक्रार मृतक जनार्धनची पत्नी देवकाबाई हिने आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. या प्रकरणाचा निकाल गुरूवारी लागला. यामध्ये मंजुळाबाई बोंडकू मेश्राम, मोरेश्वर हरीजी मेश्राम, विलास मानू मेश्राम या तीन आरोपींना कलम ३२६, १४९ अन्वये पाच वर्ष कारावास व २०० रूपये दंड सुनावला आहे. सुधीर सोनूजी मेश्राम, कालिदास मुखरू कांबळे, कृष्णा ननू मेश्राम, चंद्रकला उर्फ संगीता हरीजी मेश्राम, ज्योती उर्फ हरीजी मेश्राम, उर्मिला विलास मेश्राम यांना भादंवि कलम ३२३, १४९ सहा महिने कारावास व २०० रूपये दंड सुनावला आहे. हरीजी ननू मेश्राम याला कलम १४७ अन्वये सहा महिने व २०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी सुनावली. प्रकरणाचा तपास पीएसआय अजित कुलीराम सिद यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. न्यायालयात कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पीएसआय जयेश खंदरकर, नितीन शिंदे यांनी कामगिरी बजावली.