शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पानठेलाधारकांनी पर्यायी व्यवसाय करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:13 IST

मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिजे,

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : कार्यशाळेत अनेक पानठेलाधारकांनी व्यक्त केले मनोगत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिजे, पानठेलाधारकांनी मुद्रा लोन घेऊन पर्यायी व्यवसाय करावा, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.राष्ट्रीयतंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर परिषद आणि अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्थानिक गोंडवाना कलादालनात गडचिरोली शहरातील पानठेलाधारक व तंबाखू विक्रेत्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे भोंबे, डॉ.नंदू मेश्राम, मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, पानठेलाधारकांवर आपण अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. तंबाखू मुक्तीच्या कार्यासाठी पानठेलाधारकांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करीत भविष्यात पानठेलाधारकांना पर्यायी उपजीविकेचे साधन कशा पद्धतीने मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी यावेळी सांगितले. कौशल्य व्यवस्थापक गणेश ठाकरे यांनी राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यासाठी न.प.च्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले.बिज भांडवल पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत भोंबे यांनी मार्गदर्शन केले. शेती व्यवसायाला पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय उभारून आर्थिक उत्पन्न मिळविता येते, त्यासाठी नागरिकांनी मत्स्य व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी यावेळी केले. डॉ.नंदू मेश्राम यांनी प्रास्ताविकातून तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले. संचालन गणेश नाईक यांनी तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी