शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे गहाण सोने परत करा

By admin | Updated: December 31, 2015 01:32 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलताना सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, याकरिता क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

तहसीलदारांना निवेदन : आरमोरी तालुका महिला काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीआरमोरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलताना सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, याकरिता क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने ज्या शेतकऱ्यांनी सावकार व सोनाराकडे सोने गहाण ठेवलेले आहे ते सोने परत मिळवून द्यावे, याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आरमोरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी सोने सोनार व सावकारांकडे गहाण ठेवले आहे. गहाण असलेले सोने शेतकऱ्यांना परत मिळावे व सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, या हेतूने सोने गहाण ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सहाय्यक निबंधकांकडे पाठविण्यास सांगण्यात आले होते. परंतु अनेकांनी हेतुपुरस्सर प्रत्येक गावातून एक ते दोनच शेतकऱ्यांचे नाव सहाय्यक निबंधकांकडे पाठविले. इतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. परिणामी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. शेतकरी पुन्हा सावकारी पाशात ओढला जात आहे. या योजनेच्या लाभातून वंचित शेतकऱ्यांची फेर चौकशी करून त्यांना ताबडतोब सदर लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देताना उपाध्यक्ष वृंदा गजभिये, दिलीप घोडाम, बाजीराव सयाम, दीपक दुपारे, गोविंदा पुसाम, उद्धव मैंद, दामोधर बारापात्रे, लालाजी मैंद, माणिक कुंभारे, प्रमोद लाडे, दामोधर कांदोर, उमेश कुमरे, तातीराम सयाम व पदाधिकारी हजर होते. (वार्ताहर)