जातनिहाय जनगणना करा : राष्ट्रीय ओबीसी संघाचे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, ओबीसी प्रवर्गाला लागणारी नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वाढवून देण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फ्रि शीप ४.५० लाखावरून ६ लाख करण्यात यावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. १ जानेवारी २०१६ पर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी संघाने दिला आहे. निवेदन देतेवेळी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सचिन पुस्तोडे, प्रशांत राजगिरे, पराग लाडे, मनोज ठाकरे, श्रीकांत खुणे, कैलाश लांजेवार, रोहित लांजेवार, ओमप्रकाश गभणे, सुनील लांजेवार, नितीन माकडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
ओबीसीं समाजाच्या समस्यांकडे लक्ष द्या
By admin | Updated: September 17, 2015 01:43 IST