अहेरी : तालुक्याच्या नागेपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत माेदूमडगू येथे सार्वजनिक जागेवर एका इसमाने अतिक्रमण केले हाेते. परिणामी नागरिकांना आवागमनासाठी अडचण निर्माण हाेती. दरम्यान, जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गावात जाऊन अतिक्रमित जागेची पाहणी केली. त्यानंतर या समस्येवर ताेडगा काढून रस्त्याचे काम मंजूर केले. आता अतिक्रमण काढल्यामुळे येथून सार्वजनिक रस्ता हाेणार आहे.
नागेपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माेदूमडगू येथील प्राथमिक आराेग्यवर्धनी केंद्राच्या बाजूने रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले हाेते. मात्र सदर जागेवर एका खासगी इसमाने अतिक्रमण केले हाेते. त्यामुळे रस्ता तयार करण्यासाठी अडचण निर्माण हाेत हाेती.
यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने अनेकदा त्या व्यक्तीस अतिक्रमण काढण्याची सूचना केली हाेती. मात्र ताे व्यक्ती स्वत:हून अतिक्रमण काढत नव्हता. परिणामी रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी विलंब हाेत हाेता. काही ग्रामस्थांनी ही बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कंकडालवार यांची भेट घेऊन उपाय सुचविण्याची विनंती केली. त्यानंतर कंकडालवार यांनी स्वत: माेदूमडगू गावात जाऊन अतिक्रमित जागेची पाहणी केली. चर्चेनंतर अतिक्रमणावर ताेडगा काढण्यात आला. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे रस्त्याची जागा माेकळी झाली. आता या ठिकाणी ग्रामस्थांसाठी प्रशस्त रस्ता तयार हाेणार आहे. याचे नियाेजन झाले आहे.
यावेळी नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण काेडापे, उपसरपंच रमेश शानगाेंडावार, विशाल रापेल्लीवार, मलरेड्डी येमुलवार, ग्रा. पं. सदस्य बेबी मंडल, करिष्मा मडावी, आशिष पाटील, राकेश काेडापे यांच्यासह ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.