शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

पावणेदोन कोटी परत जाणार

By admin | Updated: July 16, 2015 01:57 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०११-१२ या वर्षात जिल्ह्यात अंगणवाडी इमारतीची ४३५ कामे मंजूर करण्यात आली.

अखर्चित निधी : अंगणवाडी इमारत बांधकाम; चार वर्षे उलटूनही ११४ इमारती अपूर्णचलोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने २०११-१२ या वर्षात जिल्ह्यात अंगणवाडी इमारतीची ४३५ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ११४ कामे अपूर्ण आहेत. या कामावरील अखर्चित पावणे दोन कोटी रूपयांचा निधी शासनाला परत जाणार असल्याची विश्वसनिय माहिती जि.प. च्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुक्यात एकूण १७७१ अंगणवाड्यात आहेत. यापैकी बहुतांश अंगणवाड्यांच्या इमारतीची दूरवस्था आहे. तर अनेक अंगणवाड्या समाजभवन तसेच जिल्हा परिषद शाळांच्या जुन्या इमारती भरविल्या जातात. अंगणवाडी इमारतीचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने २०११-१२ मध्ये इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार नाबार्ड व जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत ४३५ अंगणवाडी इमारतीच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच नाबार्ड व डीपीडीसीकडून जि.प.ला १९ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. मिळालेल्या निधीतून जि.प. च्या बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३२१ कामे पूर्ण करण्यात आली. मंजूर ४३५ कामांची किमत प्रत्यक्षात १७ कोटी ४० लाख रूपये होती. त्यामुळे उर्वरित २ कोटी १६ लाख रूपये जि.प. प्रशासनाने यापूर्वीच शासनाला परत केले आहे. त्यानंतर अपूर्ण कामांमुळे पावणे दोन कोटींचा निधी शिल्लक राहिला. सदर निधी जमा करण्याची कारवाई प्रशासकीय स्तरावर सुरू असून या महिन्याच्या अखेरीस सदर निधी शासनाला परत केला जाणार आहे.नव्याने मंजुरी घ्यावी लागणारजिल्ह्यातील बाराही तालुक्यात एकूण ४३५ अंगणवाडी इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. यापैकी ३२१ कामे पूर्ण झाले असून ११४ कामे अपूर्ण आहेत. विहित वेळेत सदर कामे पूर्ण न झाल्याने शिल्लक निधी शासनाला परत पाठविण्याचे निर्देश वरिष्ठस्तरावरून जि.प. प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे आता अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळवावी लागणार आहे.