शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

सिरोंचातील रूग्ण हैदराबादमध्ये पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला रूग्ण हृदयरोगाने आजारी होता. तो काही दिवस उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी दवाखाण्यात गेला होता. मात्र त्रास कमी न झाल्याने ई-पास काढून तो हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल झाला. त्याच ठिकाणी त्याला ताप आल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल ३१ मे रोजी पॉझिटीव्ह आला.

ठळक मुद्देवाहन चालक व मालकाचा अनेकांशी संपर्क : सिरोंचातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून केला घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : ३१ मे रोजी सिरोंचा तालुक्यातील एका रूग्णाचा कोरोना अहवाल तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पॉझिटीव्ह आल्याने सिरोंचा शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. प्रशासनाने रूग्ण राहत असलेला ग्लासफोर्टपेठा हे गाव तसेच सिरोंचा काही भाग शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला रूग्ण हृदयरोगाने आजारी होता. तो काही दिवस उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी दवाखाण्यात गेला होता. मात्र त्रास कमी न झाल्याने ई-पास काढून तो हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल झाला. त्याच ठिकाणी त्याला ताप आल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल ३१ मे रोजी पॉझिटीव्ह आला. अहवाल पॉझिटीव्ह येताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ग्लासफोर्टपेठा हे गाव सील केले आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात बाहेरच्या नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन नगर पंचायतीमार्फत ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केले जात होते. त्याचा प्रवासाचा इतिहास तपासला जात आहे. ज्या वाहनाने तो हैदराबाद येथे गेला, त्याचा वाहन चालक सिरोंचा बसस्थानक परिसरातील असल्याने सदर वार्ड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लंबडपल्ली, बामणी, गर्कापेठा, सिरोंचा या गवांशी संपर्क आल्याने सदर परिसर सुध्दा सील करण्यात आला आहे. रूग्णाच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत, पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.रूग्ण, वाहन चालक व मालक कुठे फिरले याचा शोध घेताना कसरतआजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले सर्वच रूग्ण क्वॉरंटाईन केलेले होते. ते जिल्ह्यातील नागरिकांच्या संपर्कात आले नसल्याने त्यांच्यापासून इतरांना धोका नव्हता. मात्र ग्लासफोर्टपेठा येथील रूग्ण गावात होता. त्याची प्रकृती बिघडल्याने गुरूवारी त्याला सायंकाळी हैदराबाद येथे पोहोचविण्यात आले. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबिय होते. रूग्णाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले असता, शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सदर रूग्णाला खासगी रूग्णालयातून हैदराबाद येथील कोविड रूग्णालयात हलविले आहे.ज्या वाहनाने रूग्णाला हैदराबाद येथे पोहोचवून दिले, तो वाहन चालक सिरोंचा येथील आहे. रूग्णाला हैदराबाद येथील खासगी रूग्णालयात पोहोचविल्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन सिरोंचात परत आला. वाहन मालकानेही सदर वाहन काही जागी फिरविले आहे. तसेच वाहन चालक व मालकाचा इतरही नागरिकांशी संपर्क आला आहे. हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदर रूग्ण नेमका कोणाच्या संपर्कात आल्याने पॉझिटीव्ह आढळला हे शोधणे सुध्दा आव्हानात्मक ठरणार आहे.एटापल्लीत येणाऱ्या वाहनांची तपासणीएटापल्ली तालुक्यात सुमारे १० कोरोना रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे सर्व नागरिक क्वॉरंटाईन होते. इतर नागरिकांपासून एटापल्ली तालुक्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बाहेरून एटापल्ली तालुक्यात प्रवेश करणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर महसूल विभागाचे पथक नेमले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या