शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मधुमेह व उच्चरक्तदाबाने लाेटले काेराेना रुग्णांना मृत्यूच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामान्य आजार झाले आहेत. शहरी भागातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या बहुतांश नागरिक या आजाराने ग्रस्त राहतात.

ठळक मुद्दे२०० मृतकांना हाेते जुने आजार, काळजी घेण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील ३८४ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी १६२ जणांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास हाेता. यावरून उच्च रक्तदाब व मधुमेहग्रस्तांना काेराेनाची लागण झाल्यास धाेका हाेऊ शकण्याची शक्यता अधिक राहत असल्याचे दिसून येते. काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामान्य आजार झाले आहेत. शहरी भागातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या बहुतांश नागरिक या आजाराने ग्रस्त राहतात. या आजारांमुळे नागरिक जरी धडधाकट दिसत असला तरी त्याची राेगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे काेराेनासारख्या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून सावरणे कठीण हाेऊन बसते. गडचिराेली जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात २०० नागरिकांना विविध आजारांची लागण झाली हाेती. त्यात उच्च रक्तदाब असलेले ७८ रुग्ण, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले ५६ रुग्ण, केवळ मधुमेह असलेले २८ रुग्ण, हृदयराेग असेलेले ६, लिव्हर डिसीज असलेले ७, कॅन्सरचे ३, किडनी डिसीज असलेले ४ व इतर राेगांनी ग्रस्त असलेल्या १८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  

काेणताही आजार नसलेल्या १८४ जणांचा गेला प्राण एखादा जुना आजार असेलेल्या व्यक्तीला काेराेनाचा संसर्ग झाल्यास त्या व्यक्तीला सर्वाधिक धाेका राहते. मात्र, काेणताही आजार नसलेेल्या १८४ रुग्णांनाही प्राण गमवावा लागला आहे. हे रुग्ण केवळ काेराेनाने ग्रस्त हाेते. यावरून राेगग्रस्तांसाेबतच सामान्य व्यक्तींनाही काेराेनामुळे धाेका हाेऊ शकतो. 

काेराेनाच्या पहिल्या लाटेत मधुमेह व उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांनीही काेराेनाला हरविले हाेते. दुसऱ्या लाटेत मात्र धडधाकट काेराेना रुग्णांनही जीव गमवाला लागत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या