शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

चामोर्शी ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी फुल्ल

By admin | Updated: September 19, 2016 01:55 IST

चामोर्शी परिसरातील ग्रामीण भागात दमट वातावरणामुळे तापाची साथ पसरली असून यामुळे ग्रामीण रूग्णालय फुल्ल झाले आहे.

अपुरी बेड व्यवस्था : ग्रामीण भागात तापाची साथ वाढलीचामोर्शी : चामोर्शी परिसरातील ग्रामीण भागात दमट वातावरणामुळे तापाची साथ पसरली असून यामुळे ग्रामीण रूग्णालय फुल्ल झाले आहे. ३० खाटांच्या या रूग्णालयात ५० पेक्षा अधिक रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना फरशीवर गादीवर झोपून उपचार घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. चामोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा भार येथील ग्रामीण रूग्णालयावर अवलंबून आहे. त्यामुळे या रूग्णालयात वर्षभर गर्दी राहते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून अनेक रूग्ण चामोर्शी येथे उपचारासाठी भरती केल्या जाते. त्याचबरोबर गंभीर स्थितीतील रूग्णाला सर्वप्रथम चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात व त्यानंतर त्याला गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. त्यामुळे या रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांची नेहमीच गर्दी राहते. बाह्यरूग्ण विभागात सुध्दा सद्य:स्थितीत दरदिवशी ३०० ते ३५० रूग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रूग्णालय स्थापन करावे अशी मागणी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे. उपजिल्हा रूग्णालय झाल्यास या रूग्णालयात अधिक सुविधा राहतील. जास्त खाटा राहत असल्यामुळे रूग्णांवर खाली झोपून उपचार घेण्याची वेळ येणार नाही. (शहर प्रतिनिधी)