शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पातागुडमला पोलीस ठाणे होणार

By admin | Updated: March 1, 2016 00:55 IST

तालुका मुख्यालयापासून ६७ किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नवीन पोलीस ठाणे (चौकी) प्रस्तावित करण्यात आली आहे.

युध्दस्तरावर कामास प्रारंभ : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गावसिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ६७ किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नवीन पोलीस ठाणे (चौकी) प्रस्तावित करण्यात आली आहे. दोन आठवड्यापूर्वी पातागुडम येथे माओवाद्यांनी केलेल्या एका नागरिकाच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सदर निर्णय तडकाफडकी घेतला आहे. पातागुडम येथे लवकरच नवे पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे.१५ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा (४०) या आदिवासी इसमाची माओवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेनंतर गडचिरोलीचा पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पातागुडम येथे पोलीस चौकीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्याची प्राथमिक प्रत्यक्ष कृती म्हणून २९ फेब्रुवारी रोजी सोमवारला बांधकाम साहित्याची सिरोंचामार्गे वाहतूक करण्यात आली. सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी प्रथम एक हेलिकॉप्टर थेट पातागुडमच्या दिशेने निघून गेले. नंतर काही वेळाने सडकमार्गे अंदाजे ९० वाहनांचा ताफा अंकिसा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गे प्रस्तावितस्थळी दाखल झाला. वाहनामध्ये सिमेंट, विटा, लोखंडी अँगल्स, कलर्स आदी साहित्य होते. यासोबतच मिस्कर, एक्झॉव्हेटर, भूसुरूंग निरोधक वाहनेही होती. या वाहनात बांधकाम कारागिर व मजुरांचे पथकही होते. यामुळे अंदाजे दीडशे घरांच्या व तीनशे लोकसंख्या असलेल्या पातागुडम गावाला सोमवारी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लवकरच या पोलीस ठाण्याची इमारत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास गृह विभागाला आहे.असामाजिक घटनांना प्रतिबंध लागणारसोमनूरची इंद्रावती नदी ओलांडल्यावर छत्तीसगडची भद्रकाली पोलीस चौकी अवघ्या दोन-अडीच किमी अंतरावर आहे. पातागुडम परिवहन घाटाहून इंद्रावती नदी पलिकडे छत्तीसगडचे पहिले गाव ‘तिमेड’ वसले आहे. येथून १० किमी अंतरावर भोपालपटणम पोलीस ठाण्ो आहे. आता महाराष्ट्र शासनाने पातागुडम येथे पोलीस चौकी उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली असल्याने असामाजिक घटनांना प्रतिबंध लागणार आहे.