शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या बसअभावी प्रवाशांची परवड

By admin | Updated: October 30, 2014 22:51 IST

गडचिरोली-आरमोरी-वडसा-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजता बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याबरोबरच कुरखेडा-वडसा-आरमोरी-गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी-वडसा-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजता बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याबरोबरच कुरखेडा-वडसा-आरमोरी-गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची बस नसल्याने विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व इतर प्रवाशांना ताटकळत बसस्थानकावर राहावे लागत आहे. त्यामुळे या मार्गे सकाळी ५ व रात्री ९ वाजताची बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.कुरखेडावरून गडचिरोलीमार्गे बसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी जडवाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर मार्गावरून अनेक कर्मचारी तसेच इतर नागरिकही नेहमीच प्रवास करतात. मात्र बसची सुविधा नसल्याने या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्याबरोबरच गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजताची बस उपलब्ध नसल्याने कार्यालयीन काम आटोपून घरी परतणाऱ्या कर्मचारी व नागरिकांना अनेकदा आरमोरी व देसाईगंज तर कधी गडचिरोलीतच मुक्काम ठोकावा लागतो. परिणामी अनेकदा महत्वपूर्ण कामे वेळेवर होऊ शकत नाही. जिल्हा मुख्यालयातूनही सदर मार्गे सकाळच्या सुमारास जाणाऱ्या प्रवाशांनाही बसची सुविधा वेळेवर उपलब्ध होण्यास अडचण जात आहे. त्यामुळे गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-कुरखेडा मार्गे रात्री ९ वाजताची तर कुरखेडा - देसाईगंज - आरमोरी -गडचिरोली मार्गे सकाळी ५ वाजताची बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)