कुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावरील लेंढारी गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारे वाहन व कार यांच्यामध्ये झालेल्या धडकेत कोरची ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन तलमले हे गंभीर तर इतर १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी घडला आहे. भंडारा जिल्ह्यातील कोदामेळी येथील नातजोगी समाजाच्या लोकांना घेऊन एमएच ३७ ए ७९ हे खासगी प्रवासी वाहन येत होते. दरम्यान ,लेंढारी गावाजवळ वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या वाहनाने एमएच ३४ एए ३६६८ या या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील डॉ. केतन तलमले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ ब्रह्मपुरी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. इतर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामध्ये श्रावण चव्हाण, लक्ष्मी शिंदे, रणजी चव्हाण, फुलाबाई चव्हाण, ताराबाई शिंदे, गिरजाबाई शिंदे, कार्तिक शिंदे, निलकंठ शिंदे, क्रिष्णा शिंदे यांचा समावेश आहे. सर्व जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रवासी वाहनातच असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला काहीही झाले नाही. प्रवासी वाहन राजू मोहुर्ले चालवीत होते तर कार वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन तलमले स्वत: चालवीत होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
प्रवासी वाहनाची कारला धडक
By admin | Updated: December 8, 2015 01:48 IST