शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी जीप उलटून पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:16 IST

तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी जीप उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली...

ठळक मुद्देदुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न : चांदागड-मोहगाव मार्गावर कोसी फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी जीप उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडलीया अपघातात दुचाकीवरील तीन, तर चारचाकीतून प्रवास करणारे दोन, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये कोसी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अक्षय बाळापुरे (३६), जीवन बोगा (५०) रा.कोसी, फुलचंद बोगा (३२) रा. पळसगाव, काशीराम वट्टी (५५) रा.मोहगाव व गुलाब भिवनकर (५७) रा. तळोधी-बाळापूर यांचा समावेश आहे.या घटनेत तीन जण मोटारसायकलने सोनसरीवरून कोसीला जात होते. दरम्यान मोहगाववरून कुरखेड्याकडे प्रवासी घेऊन येणाºया खासगी चारचाकी वाहनाच्या चालकाचे दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहन उलटले. घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना उपचारासाठी सहकार्य केले.गेल्या काही दिवसांपासून कुरखेडा तालुक्यासह जिल्हाभरात अपघात वाढले आहेत. ओव्हरलोड वाहतूक वाढल्याने अपघात होत आहेत. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. घटनास्थळावर पाहणाºयांची गर्दी झाली होती.