शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात रंगली मांसाहाराची पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:36 IST

पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली.

ठळक मुद्देचौकशी करून कारवाईची मागणी : पेरमिली वन कर्मचाऱ्यांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली. याचे फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याने सदर पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे.अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयाला नक्षल्यांनी दोन ते तीनवेळा आग लावली होती. त्यामुळे मागील चार वर्षांपासून पेरमिलीचे वनपरिक्षेत्र कार्यालय आल्लापल्ली येथे हलविण्यात आले आहे. या कार्यालयासाठी आलापल्ली येथे एक इमारत उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात सदर कार्यालय सुरू आहे. या वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर एक वनपाल सेवानिवृत्त झाले. या दोघांनाही निरोप देण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी दिवसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबचे एक पत्र तयार करून त्यात वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र कार्यालयातच ठेवण्यात आले होते. यासाठी वनपाल ६०० रूपये, वनरक्षक ३०० रूपये व वनमजुरांकडुन २०० रूपये गोळा करण्यात आला. कार्यक्रमानंतर मांसाहारी जेवनाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे मांसाहार कार्यालयाच्या परिसरातच शिजविण्यात आला होता. निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यालयातच वनकर्मचारी व अधिकारी यांची जेवनाची पंगत बसली.शासकीय कार्यालयामध्ये मांसाहारी पार्टीचे आयोजन करण्यावर बंदी आहे. मात्र नियम डावलून या ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, जेवन करता वेळेसचे फोटो या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे हा विषय आलापल्ली परिसरात चर्चीला जात आहे. सदर फोटो लोकमत प्रतिनिधीकडे उपलब्ध आहेत. या पार्टीत सहभागी व आयोजन करणाºया वन कर्मचाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.वरिष्ठ वनाधिकारी होते दौऱ्यावरज्या दिवशी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्या दिवशी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली हे आलापल्ली परिसरात दौऱ्यावर होते. तरीही या कर्मचाऱ्यांनी मांसाहार पार्टीचे आयोजन करण्याची हिंमत केली. यावरून वन कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पार्टीचे आयोजन हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा इतरही कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या मांसाहारी पार्ट्या रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग