कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव (गेवर्धा) येथे बाल हौशी गणेश मंडळाच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गेवर्धाच्या सरपंच सुषमा मडावी यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जगदीश बोरकर, माजी सरपंच टिकाराम कोरेटी, पोलीस पाटील रेशम गायकवाड, भाजपयुवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मंगेश मांडवे, भास्कर बन्सोड, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, योगेश गायकवाड, गुरुनाथ सुकारे, माणिक गायकवाड, हिरामण गायकवाड, हरिदास गोबाडे, प्रभू गायकवाड उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात उपसरपंच ओमप्रकाश बोगा, मंडळाचे अध्यक्ष डाकराम कुमरे, टिकाराम कोरेटी यांच्यासह १५ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी रोशन सय्यद, सुषमा मडावी, डाॅ. जगदीश बोरकर, टिकाराम कोरेटी यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राहुल बांगरे, तर आभार रामकृष्ण बोरकर यांनी मानले.
200921\fb_img_1632130721977.jpg
खेडेगाव रक्तदात्याला प्रमाणपत्र प्रदान करताना सरपंच सूषमा मडावी