शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१२ ग्रामसभेचे सदस्य स्वच्छता अभियानात सहभागी

By admin | Updated: September 23, 2016 01:42 IST

तालुक्यातील करेमरका गावात १९ सप्टेंबरला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. करेमरका ग्रामस्थांनी गावाच्या आर्थिक,

करेमरका गावात कार्यक्रम : शेतात फवारणीही केलीधानोरा : तालुक्यातील करेमरका गावात १९ सप्टेंबरला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. करेमरका ग्रामस्थांनी गावाच्या आर्थिक, सामाजिक विकासाकरिता महिला ग्रामसभा तयार केली आहे. महिला ग्रामसभेने आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन वेगवेगळे कृती कार्यक्रम राबविण्याआधी ग्राम स्वच्छता अभियान हाती घेतले. या अभियानात दराची, डब्बा, तोयागोंदी, गट्टेपायली, गिरोला, ढवळी, मकेपायली, मेंढाटोला, हेटी, वर्कीकसा, जपतलाई, कोसमटोला या १२ गावातील ग्रामसभांचे सदस्य उपस्थित होते. गट ग्रामपंचायत सालेभट्टीच्या सचिवांना बोलविण्यात आले व नाल्यावर पूल बांधण्याविषयी त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आ. हिरामण वरखडे यांनी रासायनिक खताचा वापर न करता वनस्पतीला लागणाऱ्या ऊर्जेचा खरा स्त्रोत हा सूर्य आहे, असे सांगत जंगलातील पालापोचाळा व झाडी खालील माती, गोमूत्र, गूळ-बेसन, मोहफूल आदींचा वापर करून त्याचे रसायन तयार करून सांदवाडीतील भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी याचा वापर करावा, तसेच कारले, दुधी यांच्या वेलीवर तसेच शेतातील धान्यावर या रसायनाने फवारणी करावी, अशी सूचना केली. गावातील महिलांनी सर्व घरांची पाहणी करून शौचालय, बाथरूम याचा वापर कसा करावा, याबाबत विद्या वरखडे यांनी मार्गदर्शन केले. महिला ग्रामसभेच्या खात्यातील निधीचा वापर कुर्मा घर, बाथरूम, शौचालय याचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो, असे माजी आ. वरखडे यांनी सूचविले. सांस्कृतिक सभागृह गोटूलची साफसफाई करण्यात आली. यावेळी महिला ग्रामसभा संयोजिका विद्या वरखडे, छाया पोटावी, कौशल्या तुलावी, शांताबाई नरोटे, हिरामण गावळे, रवींद्र नरोटे, गीता मडावी, वनीता कोल्हे, महादेव नरोटे आदी उपस्थित होते. यापूर्वीही १२ गावातील महिलांनी एकत्र येऊन गावात विविध उपक्रम राबविले आहेत व हा नित्यक्रम सतत कायम ठेवण्यात आला आहे.