शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परीट समाजाच्या समस्या शासनापुढे मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:17 IST

संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा लाभलेला परीट समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी नियोजनात्मक लढाई लढावी लागणार आहे.

ठळक मुद्देमहादेव जानकर यांचे आश्वासन : गडचिरोली येथे संत गाडगेबाबा जयंती महोत्सव

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा लाभलेला परीट समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी नियोजनात्मक लढाई लढावी लागणार आहे. आपल्याला समाजाच्या समस्यांची जाणीव असून या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले.श्री संत गाडगेबाबा स्मृती संस्था गडचिरोली तथा धोबी, परीट, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक पटेल मंगल कार्यालयात श्री संत गाडगेबाबा जयंती महोत्सव शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय गोरडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनोज साबळे, भंडार जिल्हा दुग्धसंघाचे अध्यक्ष रामदास चौधरी, विनोद कोल्हटकर, अरुण पेंदोरकर, दयाराम मेश्राम, प्रमोद केळझरकर, भैय्याजी रोहणकर, स्वप्नील वरघंटे, कवडू पेंदोरकर, विजय कामनपल्लीवार, सतीश मेश्राम, प्रल्हाद कावळे, रमेश गुंडमवार, सुरेश केळझरकर, अमोल गण्यारपवार, संगीता गडपायले, रोशनी वरघंटे, मंगला केळझरकर, शोभा रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना जानकर म्हणाले परीट समाजावर आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला आहे. आरक्षण देत असतांना अडचणी येत असल्या तरी त्याचा अभ्यास करावा लागेल. संत गाडगेबाबांचा वारसा सांभाळतांना त्यांचे विचार आत्मसात करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाबरोबरच इतर शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी लढा उभारावा. समाजाचे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी सजातील युवकांनी उद्यागाची कास धरणे आवश्यक आहे. समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पंतप्रधानांसमोर समाजाचा वकील म्हणून उभे राहण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगीतले. विजय गोरडवार यांनी मार्गदर्शन करताना समाजातीच्या समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन साई कोंडावार यांनी मानले.