शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालक जिल्हा कचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 01:26 IST

स्थानिक कार्मेल हायस्कूलमधून शैक्षणिक सत्र २०१७ तील इयत्ता दहावी (सीबीएसई)ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ...

कार्मेल हायस्कूलच्या निकालाचे प्रकरण : घोळ दुरूस्त न केल्यास उपोषण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक कार्मेल हायस्कूलमधून शैक्षणिक सत्र २०१७ तील इयत्ता दहावी (सीबीएसई)ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने अत्यंत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चेन्नई सीबीएसई बोर्डाला संबंधित शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे गुण कमी दिल्याने १७ विद्यार्थ्यांना सीजीपीए हा शुन्य मिळाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकाने शनिवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली. या संदर्भात पालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना निवेदन दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. गडचिरोली यांच्याही कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. दिलीप बारसागडे, विजय श्रुंगारपवार, शशी किरमोरे, पूर्वा ताडुरवार, रमेश जोशी, पुष्पलता खवळ, प्रदीप गुंडावार, सुनिल धात्रक आदीसह शेकडो पालक उपस्थित होते. पालकांनी निवेदना म्हटले आहे की, सद्य:स्थितीत सीबीएसई इयत्ता अकरावीचे प्रवेश सुरू झाले असून प्रवेश मर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र कार्मेल हायस्कूलमधील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुधारीत गुणपत्रिका न मिळाल्याने ते पुढील महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कारमेल हायस्कूलच्या प्रशासनाकडून पालकांना दिशाभूल करणारी उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास २२ जूनपासून अन्यायग्रस्त पालक शाळा प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करतील, असा इशाराही पालकांनी निवेदनातून दिला आहे. चेन्नई व दिल्ली सीबीएसई बोर्डाकडे पाठपुरावा करून आमच्या पाल्यांना सुधारीत गुणपत्रिका २१ जूनपर्यंत द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.