शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

भरमसाठ शुल्काने पालक हैराण

By admin | Updated: April 9, 2015 01:25 IST

इंग्रजी माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंटच्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने शुल्क धोरण जाहीर केले.

देसाईगंज : इंग्रजी माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंटच्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने शुल्क धोरण जाहीर केले. मात्र या शुल्क धोरणाला जिल्हाभरातील कॉन्व्हेंटनी धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारात असल्याचे चित्र आहे. देसाईगंज शहरातील साऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडले आहे.देसाईगंज शहरातील व तालुक्याच्या मोठ्या गावातील इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी वर्गाच्या प्रवेशासाठी सहा हजार रूपयांपर्यंत पालकांकडून शुल्क घेतले जात आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणे कठीण झाले आहे. दरवर्षी साधारणत: परीक्षेचा काळ असलेल्या एप्रिल महिन्यात कॉन्व्हेंटची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश झालेल्या वर्गाची परीक्षा झाल्यानंतर पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी शुल्क आकारून विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित केला जातो. सदर प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश शुल्क समिती गठित केली जाते. मात्र या समितीमध्ये कॉन्व्हेंट चालविणाऱ्या संस्थांकडून आपल्या मर्जीतील लोकांचा भरणा केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात शुल्क आकारल्या जाते. कॉन्व्हेंटला अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेली शुल्क नियंत्रण समितीही संस्थेला सहकार्य करीत असते. नर्सरी वर्गाच्या प्रवेशासाठी सहा हजार रूपये शुल्क भरून पालकांना गणवेश व पाठ्यपुस्तके आपल्या स्तरावरून खरेदी करावे लागतात. त्यामुळे नर्सरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च १५ हजाराच्या आसपास जातो. नर्सरीपुढील प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. देसाईगंज शहरात कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गाच्या विद्यार्थी प्रवेशासाठी आठ ते दहा हजार रूपयांचे शुल्क आकारले जात आहे. पाठ्यपुस्तकांसाठी दीड हजार व गणवेशासाठी दोन हजार रूपयांचा खर्च पालकांना करावा लागतो. याशिवाय वाहतूक खर्च व कान्व्हेंटचे मासिक शुल्क नियमित अदा करावे लागते. इतर उपक्रमांसाठीही अनेकदा ५० ते १०० रूपये कॉन्व्हेंटला द्यावे लागतात. (वार्ताहर)