आमदारांवर कारवाईची मागणी : मुलचेरा, कोरची, देसाईगंज येथील काम ठप्पगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी तलाठ्यांनी जिल्ह्यात ६ जूनपासून सुरू केलेल्या लेखनीबंद आंदोलनाचे रूपांतर १० जूनपासून धरणे आंदोलनात झाले. अनेक ठिकाणी तलाठ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून धरणे आंदोलनात सहभागी होत असल्याचे कळविले. मुलचेरा तालुक्यात ६ जून पासून तलाठ्यांनी लेखनीबंद आंदोलन सुरू केले व आ. डॉ. देवराव होळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने १० जून रोजी तहसीलदारांना निवेदन सादर करून धरणे आंदोलनात सहभागी होत असल्याचे कळविले. निवेदन देताना विदर्भ तलाठी संघाचे अध्यक्ष, सचिव तसेच तलाठी उपस्थित होते. कोरची तालुक्यातही तलाठ्यांनी ६ जून पासून लेखनी बंद आंदोलन सुरू केले. आ. डॉ. देवराव होळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. देसाईगंज तालुक्यातही विदर्भ पटवारी संघाच्या वतीने लेखनीबंद आंदोलन सुरू करण्यात आले. आमदारांच्या विरोधात गुन्ह्याची नोेंद होईपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा देसाईगंज तालुका पटवारी संघाच्या वतीने देण्यात आला.
तलाठ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: June 11, 2016 01:32 IST