शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हे पाहा जावयाचे लाड, शासकीय कार्यालयांकडे अडीच काेटी बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे.

लाेकमत न्यूजन नेटवर्कगडचिराेली : सर्वसामान्य नागरिक महिनाभराचे वीजबिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सूचना देतात. मात्र, शासकीय कार्यालयांकडेसुद्धा महावितरणची थकबाकी सुमारे अडीच काेटी रुपये आहे. मात्र अजूनपर्यंत शासकीय कार्यालयाची वीज कापल्याचे ऐकिवात नाही. महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे. शासकीय कार्यालयांना खर्चासाठी वर्षातून एकदा अनुदान मिळते. त्यामुळे शासकीय कार्यालयांना तर वर्षभर उधार वीज द्यावी लागते. खर्च व उत्पन्न यांचा व्यवस्थित ताळमेळ जाेडत नसल्याने दिवंसेदिवस महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय वाईट हाेत चालली आहे. ही स्थिती वेळीच सावरण्यासाठी वेळेवर वीज बिलांची वसुली हाेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

शासकीय कार्यालयांची वीज का कापत नाही? सामान्य नागरिकांना त्रस्त करून साेडणारी महावितरण शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा का खंडित करत नाही, असा प्रश्न आहे. शासकीय कार्यालयासाठी लागणारे इतर साहित्य ज्याप्रमाणे नगदी स्वरूपात आणले जातात. तसेच वीजबिलासाठीही अगाेदरच अनुदानाची तरतूद करण्याची गरज आहे. महावितरण ही शासकीय कंपनी आहे. महावितरणने शासनाला सवय लावण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय

-    शासकीय कार्यालयांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी शासनाकडे राहते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा माेठ्या प्रमाणात अपव्यय केला जाते. 

-    लाईट, पंखे, एसी व इतर उपकरणे अनावश्यक सुरू ठेवली जातात. अनेक अधिकारी घरी कूलरमध्ये राहतात. मात्र कार्यालयात एसीचा वापर करतात. अनुदानापेक्षा वीजबिल अधिक झाल्यानंतर पुन्हा अडचण वाढते.

२ काेटी ५२ लाख थकलेजिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे २ काेटी ५२ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. वेळाेवेळी सूचना देऊन अनुदान नसल्याच्या कारणास्तव वीजबिल भरले जात नाही. ही गंभीर बाब आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज