शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला वाहन देणाऱ्या पालकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:26 IST

अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देट्रिपलसिट बसविले : गडचिरोली न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे.साहेबराव मोनाजी वाकोडे रा. रामनगर गडचिरोली असे शिक्षा झालेल्या पालकाचे नाव आहे. साहेबराव यांनी अल्पवयीन मुलीला दुचाकी वाहन चालविण्यास दिले. या वाहनाची कागदपत्रे सुध्दा नव्हती. सदर अल्पवयीन मुलीने वाहनावर ट्रिपल सिट बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता, अशी फिर्याद गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी लक्ष्मीछाया तांबूसकर यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आत्माराम गोन्नाडे यांनी केला. या प्रकरणाचा निकाल ८ जुलै रोजी लागला आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी अल्पवयीन मुलीच्या पालकाला भादंवि कलम २७९, १०९ अन्वये एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा करावास, कलम ३३६, १०९ अन्वये २५० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, मोटार वाहन कायदा कलम १४६, १९६ अन्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे तत्कालीन सहायक सरकारी अभियोक्ता महाजन यांनी काम पाहिले.पालकांना धडाअनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देतात. अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र याचे उल्लंघन केले जाते. न्यायालयाच्या या निकालामुळे अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देणाºया पालकांना धडा बसला आहे.वाहतूक पोलिसांची धडक मोहीमशाळा सुरू झाल्याने अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. याला प्रतिबंध बसावा यासाठी गडचिरोली पोलीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.