शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाेचमपल्ली, अमरावतीत गुळाचा सडवा केला नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:36 IST

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथे अवैधरीत्या दारू गाळली जात आहे. गावात ५ दारूविक्रेते सक्रिय असून, ...

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथे अवैधरीत्या दारू गाळली जात आहे. गावात ५ दारूविक्रेते सक्रिय असून, त्यांनी पाेलिसांच्या सूचनेला न जुमानता अवैध दारूविक्री सुरूच ठेवली आहे. याबाबतची माहिती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला मिळताच गावातील चार ठिकाणी तपासणी केली. दरम्यान, एका घरी १८ हजार रुपये किमतीचा तीन ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली.

तसेच तालुक्यातील कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत एका दारूविक्रेत्याच्या घर परिसरात असलेला तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला. कोटा पोचमपल्ली येथे गाव संघटनेच्या प्रयत्नांतून अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, गावातील एका मुजोर दारूविक्रेत्याने दारूविक्री करण्याच्या उद्देशाने घराजवळ गुळाचा सडवा टाकला होता. याबाबतची माहिती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूला प्राप्त होताच अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार दारू विक्रेत्याच्या घर, परिसराची तपासणी केली असता जमिनीत मोठे तीन ड्रम गाडलेले व त्यात गुळाचा सडवा टाकला असल्याचे दिसून आले. एकूण १८ हजार रुपये किमतीचा तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच गावात पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी दारूविक्रेत्यास देण्यात आली.

बाॅक्स

जंगलाच्या आधाराने लावतात भट्ट्या

सिराेंचा तालुक्यातील बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. नद्या, नाले व ओढे असल्याने झुडपांचा आधार घेऊन दारू गाळण्यासाठी भट्ट्या लावल्या जातात. अनेक गावांमध्ये दारू गाळणे हा कुटीर व्यवसाय झाला आहे. दुर्गम भाग असल्याने या परिसरात पाेलीस कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे अवैध धंदे फाेफावले आहेत. जंगलाच्या आड दारू गाळून गाव परिसरात त्याची विक्री केली जाते.

===Photopath===

240421\24gad_7_24042021_30.jpg

===Caption===

पाेचमपल्ली व अमरावतीत अशाप्रकारे गूळसडवा गाडून ठेवला हाेता.