शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मोहली केंद्रावरील धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

मोहली येथील धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या धानाचे बिल तयार करण्यास दिरंगाई व्हायची. तसेच खरेदी केलेले धान उघड्यावर पडून होते. उचल करण्यास दुर्लक्ष केले जायचे. शेतकऱ्यांचे चुकारेही अडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या.

ठळक मुद्देदेयके बनविण्याचे काम सुरू : संचालक मंडळाकडून व्यवस्थापकाची उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्करांगी : धानोरा तालुक्यातील मोहली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकाविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल संचालक मंडळाने घेऊन बैठक बोलाविली व व्यवस्थापकांची उचलबांगडी केली. त्यामुळे सध्या काटा करण्याचे काम बंद झाले असून बिल तयार करणे व हुंड्या टाकण्याचे काम सुरू आहे.मोहली येथील धान खरेदी केंद्रावरील व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. या संदर्भात माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या धानाचे बिल तयार करण्यास दिरंगाई व्हायची. तसेच खरेदी केलेले धान उघड्यावर पडून होते. उचल करण्यास दुर्लक्ष केले जायचे. शेतकऱ्यांचे चुकारेही अडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे संचालकांनी तातडीने बैठक घेऊन व्यवस्थापकांना नोटीस बजावले व त्यांच्याकडील कारभार काढून घेतला. येथील खरेदी केंद्रात आतापर्यंत १३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी केवळ १ हजार ४०० क्विंटल धानाची उचल झाली आहे. खरेदी केलेला उर्वरित धान अद्यापही केंद्रावर पडून आहे. १ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीतच आधारभूत धान खरेदी केली जाते. जवळपास २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु केंद्र परिसरात अद्यापही धान पडून असल्याने धानाची खरेदी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. यातच पुन्हा खरेदी केंद्रावरील काटा बंद करण्यात आल्याने धानाची खरेदी केव्हा होणार, अशी प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी महिनाभरापासून माल आणून टाकला आहे.आयडी केला रद्दमोहली येथील व्यवस्थापक लोणारे यांच्याकडील प्रभार काढून तात्पुरत्या स्वरूपात रांगी येथील सुरेश हलामी यांच्याकडे सोपविला आहे. तसेच त्यांचा आयडी रद्द करण्यात आल्याची माहिती धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाने दिली.