लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड केल्यानंतर धानपीक सुरूवातीला चांगल्या स्थितीत होते. दरम्यान धान भरल्यानंतर मावा, तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उभे धानपीक कोसळले. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.ही परिस्थिती चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे. धान पिकावर यंदा मावा, तुडतुडा, खोडकिडा, करपा आदी प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने धानाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन उभे धानपीक कोसळायला लागले आहे.परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा तसेच शेतजमिनीत पाणी असल्यामुळे कोसळलेले धानपीक सडून उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा भयावह परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
रोगामुळे धानपीक कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:10 IST
यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड केल्यानंतर धानपीक सुरूवातीला चांगल्या स्थितीत होते.
रोगामुळे धानपीक कोसळले
ठळक मुद्देउत्पादन घटणार : रोग प्रतिकारक शक्ती झाली कमी