शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

लाखो रूपयांचे धान ताडपत्रीने झाकून

By admin | Updated: August 19, 2016 00:56 IST

आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरीअंतर्गत भामरागड केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फतीने

सडण्याच्या मार्गावर : गोदाम नसल्याचा परिणाम; शेतकऱ्यांना सोयीसुविधांचा अभाव भामरागड : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरीअंतर्गत भामरागड केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फतीने धान खरेदी करण्यात आले. यापैकी काही धान गोदामामध्ये साठविण्यात आले आहे. तर काही धान मात्र उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसामुळे सदर धान ओले होऊन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०१४-१५ या हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्यात आली नाही. सुमारे १ हजार ४७१ क्विंटल धान आजही बेवारस अवस्थेत भिजत आहे. गोदामामधील धान्य सुद्धा सुरक्षित नाही. गोदामावरील टिनाला छिद्र पडले आहेत. या छिद्रांमधून पाणी गळत आहे. उघड्यावर असलेले धान्य ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे धान सडून सडलेल्या धानाची दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या धानाची नुकसानभरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामंडळाकडे धान खरेदीसाठी व रिकामे पोते खरेदीसाठीसुद्धा वेळप्रसंगी पैसे राहत नाही. २०११-१२ व २०१२-१३ मध्येसुद्धा धान भिजून शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. याचा फटका आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेलासुद्धा बसला होता. खरेदी केलेले धान साठवणूक ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ताडपत्री झाकून ठेवावा लागत आहे. दरवर्षीच शासनाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. दुर्गम भागातील शेकडो शेतकरी बैलबंड्यांच्या सहाय्याने धान आणतात. कधीकधी त्यांना मुक्कामही करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर राहण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बैलांसाठी स्वतंत्र शेडही बांधणे गरजेचे आहे. मात्र या सोयीसुविधासुद्धा निधी नसल्याचे कारण पुढे करून निर्माण केल्या जात नाही. दुसरीकडे लाखोंचे धान सडल्याने नुकसान सहन करावे लागते.