शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४८ कोटींची स्वामित्वधन वसुली

By admin | Updated: May 8, 2017 01:21 IST

सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज,

वर्षभरात : ३३ कोटींचे प्रशासनाला होते उद्दिष्ट; वसुलीची टक्केवारी १४५ वर पोहोचली लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, परमिट तसेच रेती परमिट व रॉयल्टीमधून एकूण ४८ कोटी १८ लाख ३७ हजार ३२ रूपयांचा महसूल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर गौण खनिज स्वामित्वधन वसुलीची सरासरी टक्केवारी १४६.०१ आहे. विशेष म्हणजे, शासनाने जिल्हा प्रशासनाला सन २०१६-१७ या वर्षाकरिता ३३ कोटी रूपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. प्रशासनाने वर्षभरात उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्याची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय गिट्टी, मुरूम, माती, दगडाच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे तसेच रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित कंत्राटदाराला आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन परवाना घ्यावा लागतो. त्यानंतरच सदर कंत्राटदार आपल्या विशिष्ट क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक नियमानुसार करीत असते. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला लीज व परमिट घ्यावा लागतो. यासाठी विविध विभागाकडून जिल्हा खनिकर्म विभागाला महसूल प्राप्त होत असतो. राज्य शासनाने सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाला गौण खनिज स्वामित्वधन वसुलीबाबत ३३ कोटींचे सुधारित उद्दिष्ट दिले होते. १२ तालुक्यातील सहा उपविभाग मिळून आतापर्यंत एकूण ४८ कोटी १८ लाख ३७ हजार ३२ रूपयांचा महसूूल मिळाला आहे. स्वामित्वधन वसुलीत अहेरी उपविभाग सर्वाधिक आघाडीवर आहे. या उपविभागाने एकूण ३० कोटी ९० लाख ७२ हजार ४१९ रूपयांचा महसूल मिळविला आहे. अनेक तालुक्याच्या महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून शेकडो कंत्राटदाराविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंडही वर्षभरात वसूल केला आहे. चार तालुके महसुलात आघाडीवर गौणखनिज स्वामित्वधन वसुलीत गडचिरोली, मुलचेरा, कोरची व सिरोंचा हे चार तालुके आघाडीवर आहेत. या चारही तालुक्यातील प्रशासनाने १०० टक्क्यावर स्वामित्वधन वसुली केली आहे. गडचिरोली तालुक्याच्या स्वामित्वधन वसुलीची टक्केवारी १०६.०७, मुलचेरा १०५.३६, कोरची ११४.५३ व सिरोंचा तालुक्यातील स्वामित्वधन प्राप्त महसुलाची टक्केवारी सर्वाधिक २५३.९९ आहे. महसुलामध्ये सिरोंचा तालुका गडचिरोली जिल्ह्यात प्रथमस्थानी आहे.