शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतुकीने परिसीमा ओलांडली

By admin | Updated: November 1, 2014 22:52 IST

रेल्वे स्थानकावर रॅकपार्इंटवरील माल उचल करण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़ भरधाववेग व कर्णकर्कश आवाजाच्या हार्न मुळे नागरीक त्रस्त झाले आहेत़

देसाईगंज : रेल्वे स्थानकावर रॅकपार्इंटवरील माल उचल करण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़ भरधाववेग व कर्णकर्कश आवाजाच्या हार्न मुळे नागरीक त्रस्त झाले आहेत़ या वाहनांच्या वेगामुळे कित्येक नागरीक थोडक्यात बचावले असल्याचे सांगतात. मात्र बस स्थानक परिसरात असलेल्या पोलिस चौकीतील वाहतूक पोलीस याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत़गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक शहरात असून रेल्वे प्रशासनाने जिल्हाभर रेशन, खत पुरविण्याच्या दृष्टीने येथे रॅक पाईंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ रॅक पार्इंट परीसरात जाण्याकरीता बसस्थानक परिसरातूनच जावे लागते़ रॅक पार्इंटवर मालवाहक रेल्वेगाडी येताच ट्रकसारख्या जडवाहनांची गर्दी येथे वाढते़ शहरातील बस स्थानक परीसर नेहमीच गजबजलेला असतो़ अशा वेळी माल उचल करण्याच्या नादात वाहन चालकाचा वेगावरील ताबा सूटलेला असतो़ स्वत:च्या वाहनांचा क्रमांक आधी लागला पाहिजे याकरीता टॅ्रक चालकांची धावपळ सुरू असते़ भरधाव वेग व कर्णकर्कश हॉर्न यामुळे रस्त्यावरील नागरीक अपघाताच्या भितीने आधीच बाजूला होतात़ कित्येक नागरीक या जड वाहनांच्या अपघातात थोडक्यात बचावले आहेत़ वाहतूक पोलिसांना याबाबत सूचना करूनही ते ऐकत नसल्याचे नागरीकांनी सांगितले़ रॅक पाईटवर दाखल होणाऱ्या भरधाव वाहनाच्या वेगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही़गडचिरोली शहरासह तालुक्यातही रात्रीच्या सुमारास अवैध जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. चामोर्शी, धानोरा, अहेरी, भामरागड, आरमोरी व अन्य तालुक्याच्या ठिकाणाहून रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते. गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोड जड वाहतूक होताना दिसून येत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे. ओव्हरलोड जड वाहतुकीमुळे अनेकदा अपघात घडले आहेत. पोलीस विभागाने विशेष पथक गठीत करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.