शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्रियाशील होऊन परिस्थितीवर मात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:47 IST

कृषी प्रधान भारत देशात शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. महाराष्टÑात शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर यांचे आवाहन : गडचिरोलीत बळीराजांच्या मुलांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी प्रधान भारत देशात शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. महाराष्टÑात शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र शेतकºयांच्या मुलांनी खचून न जाता जागृत होऊन लढा देण्याची गरज आहे. शेतकºयांच्या मुलांनी क्रियाशील होेऊन परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.वर्धानजीकच्या सेवाग्राम येथील बापूकुटीपासून सुरू झालेले ‘बळीराजांच्या मुलांशी संवाद’ हे अभियान प्रा. वाकुडकर यांनी सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत गडचिरोेली येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देवराव म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून गोविंदराव बानबले, माजी प्राचार्य खुशाल वाघरे, प्रा. शेषराव येलेकर, युथ फॉर स्वराज्यचे राष्टÑीय अध्यक्ष मनीष कुमार, अ‍ॅड. शकील अहमद, प्रा. बी.एस. चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. वाकुडकर यांनी आजचा विद्यार्थी क्रियाशील होऊन जागा झाला पाहिजे, असे सांगून त्यांनी काव्य सादर केले.‘बळीराज्याच्या मुला या मातीची शपथ घेऊनी, असे सांगतो तुला रे... बळी राजाच्या मुला... भीष्म, कर्ण अन् पांडव सारे, एक होवू चला रे... बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे... बळीराजाच्या मुला !!अशा अनेक कविता प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सादर करून बळीराजाच्या मुलांना उपदेश पूर्व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विलास खुणे तर आभार प्रा. स्वप्नील ढोमणे यांनी मानले.समस्या मार्गी लावण्यासाठी झटा-मनीषकुमारशेतकºयांनी आत्महत्या न करता समस्या सोडविण्यासाठी लढा दिला पाहिजे. यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असते तर शेतकºयांची अशी स्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या युवकांनी एकत्र येऊन सद्याच्या परिस्थितीशी लढा उभारावा, असे आवाहन युथ फॉर स्वराज्याचे राष्टÑीय अध्यक्ष मनीषकुमार यांनी केले.