शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी नसलेल्या 500 वर शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. 

ठळक मुद्देआरटीईनुसार पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्वच माध्यमाच्या शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा उत्तीर्ण हाेणे सक्तीचे केले आहे. मात्र जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाहीत. अशा शिक्षकांच्या नाेकऱ्या आता धाेक्यात येण्याची शक्यता आहे. खासगी शिक्षण संस्थांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळांना मान्यता देण्याचे धाेरण राज्य शासनाने २००२ पासून अंमलात आणले. गडचिराेली जिल्ह्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावरील ७२ शाळा हाेत्या. त्यापैकी ८ शाळा बंद करण्यात आल्या. ६० शाळांना २० ते ४० टक्केपर्यंत अंशत: अनुदान दिले जात आहे. ४ शाळांचे पुन:प्रस्ताव अनुदानासाठी पाठविण्यात आले आहेत. टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात करण्यात आल्या आहेत. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने या शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात आल्या आहेत. 

इंग्रजी शाळांनाही टीईटी उत्तीर्ण शिक्षक सक्तीचे

खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून परवानगी घेतात. त्यामुळे या शाळांना शासनाचे सर्वच नियम पाळणे आवश्यक आहे. राज्य बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधील शिक्षक टीईटी असणे आवश्यक आहे; तसेच सीबीएससी बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या शाळांमधील ९९ टक्के शिक्षक टीईटी व सीईटी उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून येतात. या शाळांनाही टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक नेमण्याची सक्ती करण्याची गरज आहे. 

जिल्हा परिषदेचे शिक्षक भाग्यशाली- जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची आहे. २०१९ मध्ये जवळपास ५० शिक्षकांची भरती करण्यात आली हाेती. हे सर्वच शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना या निकालाने काहीच फरक पडला नाही. - टीईटी परीक्षा सर्वसाधारण कठिण राहते. मात्र अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक ४० ते ५० वर्षाच्या दरम्यानचे आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनेकांना कठिण जात आहे. त्यामुळेच ते सुट देण्याची मागणी करीत आहेत. 

शिक्षणाधिकारी म्हणतात, चारच शिक्षकजिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसलेले चारच शिक्षक आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी निकम यांनी दिली आहे. मात्र ‘लाेकमत’ने काही मुख्याध्यापकांना फाेन करून विचारले असता, टीईटी उत्तीर्ण नसलेले ४० पेक्षा अधिक शिक्षक असल्याची शक्यता वर्तविली आहे. 

आयुष्याच्या शेवटी नाेकरी मिळाली;तीही जाण्याचा धाेका; शिक्षक पडले चिंतेतकाही शिक्षक २०१३ पूर्वीच शाळांमध्ये शिकवायला लागले. मात्र त्यांच्या पदाला मान्यता २०१३ नंतर घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षक टीईटीच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेले काही शिक्षक ४५ ते ५० वर्षांचे आहेत. नाेकरीच्या शेवटच्या टप्प्यात वेतन सुरू झाले; मात्र टीईटी नसल्याने आता नाेकरी जाण्याचा धाेका आहे.  नाेकरी गेल्यास संसार कसा करावा, असा प्रश्न शिक्षकांसमाेर निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :Teacherशिक्षक