शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३३ कोटी वृक्ष लागवड याेजनेतील ६० टक्के वृक्ष गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

संरक्षण मजुरांकरवी दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करणे, रोपांना पाणी टाकणे, झाडासभोवताल काटे कुंपण करणे, झाडांचे निंदण करणे आदी कामे करून घेण्यात आली.  एकीकडे काम करत असताना दुसरीकडच्या झाडांवर दुर्लक्ष झाल्याने बहुतांश झाडे वाळली तर काही राेपडे पाळीव प्राण्यांनी फस्त केली. जी झाडे जिवंत आहेत, त्यांची उंची तीन चार वर्षात दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक नाही. वनसेवेत राहून वनक्षेत्र वाढीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये वनव्यात हजारो झाडे जळाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड याेजनेतील रस्त्याच्या दुतर्फा जिवंत झाडांची  संख्या ४० टक्केपेक्षा कमी असून, सदर योजनेचे केवळ फलक उरले आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीनंतर सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड योजना राबवून वन संवर्धन साधण्याचा प्रयत्न केला; मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी योजनेचा गैरफायदा घेत योजनाच लांबवली. सामाजिक वनपरिक्षेत्र अंतर्गत जवळपास रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व गट लागवडीची २०० कामे करण्यात आली. दरम्यान, स्थानिक मजुरांकडून खड्डे खोदणे, झाडे लावण्याची कामे करण्यात आली, तसेच दुतर्फा व गट लागवड कामावरील संरक्षण मजुरांच्या हाताने निंदणीची कामे करून स्थानिक मजुरांच्या हक्काचा पैसा बोर्डा येथील चैतन्य सुशिक्षित बेरोजगार सहकारी मजूर संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यात आला. संरक्षण मजुरांकरवी दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करणे, रोपांना पाणी टाकणे, झाडासभोवताल काटे कुंपण करणे, झाडांचे निंदण करणे आदी कामे करून घेण्यात आली.  एकीकडे काम करत असताना दुसरीकडच्या झाडांवर दुर्लक्ष झाल्याने बहुतांश झाडे वाळली तर काही राेपडे पाळीव प्राण्यांनी फस्त केली. जी झाडे जिवंत आहेत, त्यांची उंची तीन चार वर्षात दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक नाही. वनसेवेत राहून वनक्षेत्र वाढीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये वनव्यात हजारो झाडे जळाली. निधी असेपर्यंत झाडांची जिवंत टक्केवारी दाखवायची व निधी संपल्यावर जबाबदारी झटकायची, अशी वन सेवेत परंपरा असल्यामुळे शासनाचा लाखोंचा निधी खरोखर झाडे वाढवण्यासोबतच जंगल वाढवण्यासाठी खर्च होतो का? असा प्रश्न पडत आहे. स्वार्थापोटी नियमबाह्य काम करणाऱ्या संबंधित जबाबदार वनाधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.    

काम न करता सहकारी संस्थेच्या खात्यात पैसे जमा

-    कुठलीही निविदा प्रक्रिया न करता संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मनमानी एकही काम न करणाऱ्या चैतन्य सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या खात्यात काेट्यवधी रुपयांचा निधी टाकून स्थानिक मजुरांचा रोजगार हिरावला. -    अंदाजपत्रकात झाडांना कठडे करण्याची व्यवस्था असताना कठडे न लावता संबंधित निधी अखर्चित ठेवण्यात आला. याबाबत चाैकशी झाल्यास बराच घबाळ उजेडात येऊ शकताे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग