दोन न.प. क्षेत्रात १६ : भामरागडात सर्वाधिक शाळाबाह्य मुलेगडचिरोली : राज्यातील कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ६ ते १४ वयोगटातील मुले, मुली मिळून एकूण ५०८ शाळाबाह्य बालके असल्याचे आढळून आले. सर्वेक्षणात भामरागड तालुक्यात सर्वाधिक १२७ तर गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात १६ शाळाबाह्य मुले आढळून आले आहे. शिक्षण विभाग व इतर विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाने गावागावात घरोघरी बसस्थानक, बाजार, चौकात तसेच गर्दीच्या ठिकाणी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकरिता २ हजार ६७० प्रगणक, १३७ झोनल अधिकारी व तालुकास्तरावरील १२ व जिल्हास्तरावरील तीन, असे एकूण १५ नियंत्रक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. जिल्हास्तरीय सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रणजितकुमार, सहअध्यक्ष जि.प. सीईओ संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनात सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणात जिल्ह्यात आढळली ५०८ शाळाबाह्य बालके
By admin | Updated: July 6, 2015 01:46 IST