शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रूपयांची नियमबाह्य वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:05 IST

स्थानिक चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपूर्वी चोरीला गेले.

क्लिअरन्समध्ये टाकली अट : शासकीय विज्ञान महाविद्यालयातील प्रकारगडचिरोली : स्थानिक चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपूर्वी चोरीला गेले. सदर चोरीला गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भरपाई म्हणून परीक्षेपूर्वी होणाऱ्या क्लिअरन्सच्या माध्यमातून महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रूपये वसूल करीत आहे. त्यामुळे या महाविद्यालयात शिकणारे सर्वसामान्य व गरीब विद्यार्थी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या १०० वर विद्यार्थ्यांनी थेट गोंडवाना विद्यापीठात जाऊन तेथील कुलगुरूंना लेखी निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांचे हे निवेदन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव दीपक जुनघरे यांनी स्वीकारले. सदर समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांना चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांना दिले होते. कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात इसमांनी लंपास केले असावे, सदर प्रकाराबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. मात्र महाविद्यालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नुकसानभरपाई म्हणून क्लिअरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रूपये वसूल केले जात आहेत. सदर महाविद्यालयातील आम्ही विद्यार्थी बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एवढे मोठे शुल्क भरणे आम्हाला शक्य नाही. सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या भरपाई म्हणून घेण्यात येत असलेली शुल्काची रक्कम अदा न केल्यास महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येणार नाही, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्यही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयाकडून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे पुस्तके देण्यात येत नाही. आता विद्यापीठाची सेमिस्टर परीक्षा १२ ते १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील अभ्यासक्रमीय पुस्तकांची गरज आम्हाला भासत आहे. मात्र येथील ग्रंथालय प्रमुखांच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रंथालयातील पुस्तके मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना दीडपट रक्कम डिपॉझिटच्या स्वरूपात जमा करण्यास आम्हा विद्यार्थ्यांची तयारी आहे. तरीसुद्धा महाविद्यालयाकडून आम्हाला पुस्तके देण्यासाठी चक्क नकार दिला जात आहे. त्यामुळे आमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीला गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भरपाई म्हणून घेण्यात येत असलेले २०० रूपये आकारण्यात येऊ नये, प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रमीक पुस्तके परीक्षेच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)ग्रंथालय प्रमुखाने प्राचार्यांचे आदेश धुडकावलेपरीक्षेच्या कालावधीत शासकीय विज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पाठ्यक्रमाच्या पुस्तकांसाठी गैरसोय होऊ नये, यासाठी प्राचार्यांनी ग्रंथालय प्रमुखांना विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम जमा करून त्यांना पुस्तके देण्याचे सूचनावजा आदेश दिले होते. या आदेशात प्राचार्यांनी म्हटले आहे, उन्हाळी परीक्षा २०१७ करिता महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून क्रमीक पुस्तकांच्या मूळ किंमतीच्या दीडपट अनामत रक्कम जमा करून गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत, मात्र ३१ मार्च २०१७ नंतर विद्यार्थ्यांना प्रतिक्रमीक पुस्तक प्रतिदिवस १ रूपया प्रमाणे विलंब शुल्क भरावे लागेल, सदर सवलत परीक्षा संपेपर्यंत देण्यात येईल व परीक्षा संपल्यानंतर आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्यास संबंधित विद्यार्थ्यावर विलंब शुल्क दुप्पट आकारण्यात येईल. एकूण विलंब शुल्क सर्व पाठ्यपुस्तके ज्या तारखेला जमा होईल, त्या तारखेला अदा करावे लागेल. सदर अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येतील, असे प्राचार्यांनी म्हटले आहे व या संदर्भाच्या सूचना येथील ग्रंथालय प्रमुखांना दिले आहेत. मात्र डिपॉझिट रक्कम भरण्यास तयार असलेल्या विद्यार्थ्यांनाही येथील ग्रंथालय प्रमुख परीक्षेच्या कालावधीत पुस्तके देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.