शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा आपण जिवंतच नसतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:18 IST

ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकची आता आपल्या बसला धडक बसणार ही बाब लक्षात घेऊन एसटीचे ब्रेक करकचून दाबत बस बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली.

ठळक मुद्देगुरुपल्ली येथील अपघात : बस चालकाने सांगितली आपबिती

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकची आता आपल्या बसला धडक बसणार ही बाब लक्षात घेऊन एसटीचे ब्रेक करकचून दाबत बस बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. अन्यथा माझ्यासह बसमधील कोणी प्रवासी जीवंत राहण्याची शक्यता नव्हती, अशी आपबिती गुरुपल्ली येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या अपघातातील एसटीच्या चालकाने सांगितली.अपघातग्रस्त बसचे चालक हेमंत पुल्लीवार हे या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. सदर प्रतिनिधीने त्यांचे रुग्णालयात भेट घेती असता त्यांनी त्या दिवशीचा प्रसंग सांगितला.गुरूपल्ली येथून एक प्रवासी व शाळकरी मुलगी बसमध्ये बसली. त्यामुळे बसचा वेग कमीच होता. गुरूपल्लीपासून दोन किमी अंतरावर लांब रांगेत अनेक ट्रक विरूध्द दिशेने येत होते. आधीच मार्ग अरूंद असल्याने ओव्हरटेक करण्यास जागा नसताना एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची बसला जोरदार धडक बसली. ट्रकची बसला धडक बसणार हे लक्षात येताच मी जागेवरच बसून बसचे ब्रेक जोरात दाबून ठेवले. त्यामुळे हाणी कमी होण्यास मदत झाल्याचे पुल्लीवार यांनी सांगितले.दोन्ही ब्रेक दाबल्याने बस जागेवरच थांबून होती. ब्रेक दाबले नसते तर ट्रकच्या जोरदार धडकेने बस बाजुला फेकल्या गेली असती आणि मृतांचा आकडा वाढला असता, असा थरारक अनुभव पुल्लीवार यांनी सांगितला. पायाला गंभीर दुखापत झाल्याने यापुढे बस चालवू शकणार की नाही, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.