शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:54 IST

शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत.

ठळक मुद्देनक्षल समर्थनाचा आरोपसाईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या प्रा.साईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती असून पुढील काळात त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत वरवरा राव याच्यासह एकूण पाच जणांना नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली स्थानबद्ध केले आहे. त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात राहून विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, कामगार, सांस्कृतिक संघटनांमार्फत सरकारविरूद्ध माओवादाचे ‘स्लो पॉयझन’ ते देतात. त्यासंबंधीचे भक्कम पुरावेसुद्धा असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सामाजिक अशांतता निर्माण करून सरकारविरूद्ध आवाज उठवणे आणि बंदूक हातात घेऊनच आपले हक्क मिळतील, हे त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात आहे. जे लोक यातून प्रभावित होतात त्यांना हेरून संघटनेत सक्रिय करणे, अशी नागरी क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षल समर्थकांची कार्यपद्धती आहे.हैदराबाद येथे ज्या वरवरा राव याला स्थानबद्ध करण्यात आले तो नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचा (आरडीएफ) अध्यक्ष आहे. प्रा.साईबाबा हा याच संघटनेचा सचिव म्हणून काम पहात होता. नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करून २००४ मध्ये आरडीएफची स्थापना करण्यात आली. नक्षल चळवळीसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करण्यासोबतच चळवळीसाठी पैसा गोळा करण्याचे कामही ही संघटना करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

१०० गावांत सरकार स्थापण्याचा उद्देशगेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाड, भामरागड भागातील १०० गावांत ‘आपले सरकार’ स्थापन्याचा संकल्प नक्षलींनी २००३ मध्ये केला होता. नागरिकांना आपल्या प्रभावाखाली आणून आपली हुकूमत गाजविण्याचा नक्षलींचा उद्देश काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र अलिकडे पोलिसांनी आक्रमक कारवाईसोबतच नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोलीस व लोकशाही व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण केल्याने नक्षलवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी