शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओटी सजावट स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: October 29, 2015 02:02 IST

लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सव अष्टमीनिमित्त समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्ड येथे घेण्यात आलेल्या...

देसाईगंजात कार्यक्रम : भजन, भावगीत, प्रार्थना व विविध गेम; सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाददेसाईगंज : लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सव अष्टमीनिमित्त समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्ड येथे घेण्यात आलेल्या ओटी सजावट, भजन, भावगीत, प्रार्थना व विविध गेम शो ला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्ष माधुरी श्रीराम गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रिया अजय चरडे, तालुका संयोजिका कल्पना सुरेश कापसे, मंडळाच्या सचिव निर्मला मुरलीधर बुद्धे, निरीक्षक म्हणून अ‍ॅड. तृषा कपिल भैय्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेच्या मूर्तीला हार अर्पण व शारदास्तवनाने करण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या ओटी सजावट स्पर्धेत अनेक सखींची सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक आशा बुद्धे, द्वितीय क्रमांक पल्लवी कुंभलवार यांनी पटकाविला. तर रंजना बुद्धे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. खुल्या गटात प्रथम क्रमांक माधुरी हरणे, भजन स्पर्धेत वंदना हिवरे, वैशाली शेबे, भावगीत स्पर्धेत शोभा इलमुलवार, खुल्या गटात वैद्य यांनी सुयश प्राप्त केले. तर वन मिनीट गेम शोमध्ये प्रथम क्रमांक दीपा कोकोडे, द्वितीय क्रमांक निकिता कांबळे यांनी पटकाविला. ओटी सजावट स्पर्धेचे प्रथम बक्षीस अशोक नाकतोडे यांच्याकडून ३०१ रूपये, द्वितीय राजेश बेलखुडे यांच्याकडून २५१ रूपये तर प्रोत्साहन बक्षीस मुरलीधर बुद्धे यांच्याकडून २०१ रूपये विजेत्या स्पर्धकांना देण्यात आले. लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. तृषा भैय्या यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रंजना बुद्धे तर आभार कुंता बुद्धे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसंयोजिका वनिता नाकतोडे, रिता ठाकरे, उमा बुद्धे, लीना बेलखुडे, राधिका पत्रे, सुनीता दिवटे, गीता शिंगाडे, दुर्गा नखाते, वसुंधरा वरखडे, मीनाक्षी डाबरे, माधुरी श्रीरामे, आरती भुते व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)े