शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत आज महारक्तदान शिबिराचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कॉलनीजवळच्या पोलीस हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहतील.

ठळक मुद्देबाबुजींच्या जयंतीनिमित्त आयोजन, पोलीस हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजता हाेणार शुभारंभ

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि.२ जुलै रोजी गडचिरोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस कॉलनीजवळच्या पोलीस हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहतील.या शिबिरात रक्तदान करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह गडचिरोली शहरातील आणि परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत नागरिक सरसावत आहेत. गडचिरोलीनंतर जिल्ह्याच्या इतर भागात रक्तदान शिबिर होणार आहे. पोलीस हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या तयारीसाठी जिल्हा पाेलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. शारीरिक अंतर आणि मास्क यासारख्या कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी मास्क लावूनच यायचे आहे. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाची चमूही उपस्थित राहणार आहे. 

रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व कार्डया शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्त संकलनासाठी येणार आहे. ऐच्छिक रक्तदान करणाऱ्या या शिबिरातील सर्व रक्तदात्यांना रक्तपेढीकडून प्रमाणपत्र आणि रक्तदानाचे कार्ड मिळणार आहे. गरजवंताला रक्त देण्यासाठी ते कार्ड उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे. सामाजिक दायित्वातून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस विभागासह लोकमत परिवाराने केले आहे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट