शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

ईश्वरचिठ्ठीच्या आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:53 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक खुला व एक अनुसूचित जाती प्रवर्गातून असे एकूण १० सदस्यांची निवड गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर करावयाची आहे.

ठळक मुद्देनवनियुक्त सिनेट सदस्यांचा आरोप : विद्यापीठ कायद्याचे कुलगुरूंकडून उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक खुला व एक अनुसूचित जाती प्रवर्गातून असे एकूण १० सदस्यांची निवड गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर करावयाची आहे. मात्र कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी या कायद्याचे उल्लंघन करीत व्यवस्थापन परिषदेवर सदस्य निवडीसाठी गुरूवारी ईश्वर चिठ्ठीने सिनेट सदस्यांचे आरक्षण काढले. सदर आरक्षणाला आमचा विरोध आहे, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे पदाधिकारी व नवनियुक्त सिनेट सदस्यांनी गडचिरोली येथे गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.या पत्रकार परिषदेला व्यवस्थापन परिषदेतून निवडून आलेले सिनेट सदस्य डॉ. दिलीप जयस्वाल, डॉ. देवेश कांबळे, प्राचार्य हक, प्राचार्य प्रमोद काटकर, प्राचार्य डॉ. संजय सिंग, डॉ. जयदेव देशमुख, डॉ. रमेश ठोंबरे, डॉ. प्रमोद शंभरकर, डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. प्रगती नरखेडकर, डॉ. नामदेव वरभे तसेच टिचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पेटकर आदी उपस्थित होते.यावेळी या सिनेट सदस्यांनी सांगितले की, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद निवडीसाठी राज्यपालांनी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी नवा अद्यादेश काढला. या अद्यादेशात ईश्वर चिठ्ठीने आरक्षणाची सोडत काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र सदर अध्यादेश महाराष्टÑाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे सदर अध्यादेश अंमलात येऊ शकला नाही. असे असतानाही गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी नवनियुक्त सिनेट सदस्यांचे काही ऐकून न घेता, ईश्वर चिठ्ठीने आरक्षण सोडतीची प्रक्रिया गुरूवारी पार पाडली, असा आरोप पत्रकार परिषदेतून सिनेट सदस्यांनी केला. त्यापूर्वीच डॉ. आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर असोसिएशनच्या वतीने व्यवस्थापन परिषद सदस्य निवडणुकीसाठी गुरूवारी होणारी ईश्वर चिठ्ठीने आरक्षण सोडतीची कारवाई करू नये, अशा मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना दिले होते. मात्र या निवेदनाची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही, असे सांगितले.उच्च न्यायालयात धाव घेणारमहाराष्टÑ विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेत १० सिनेट सदस्यांचा समावेश केला जातो. यामध्ये पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले दोन, प्राचार्य मतदार संघ, अध्यापक मतदार संघ, व्यवस्थापन मतदार संघ व अ‍ॅकॅडमीक कॉन्सीलमधील दोन अशा १० सदस्यांचा समावेश आहे. या पाच प्रवर्गातील एक सदस्य खुल्या प्रवर्गातील व दुसरा सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील कायद्यान्वये घेणे आवश्यक आहे. मात्र असे होत नसल्याने न्यायासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार, असा इशारा सिनेट सदस्यांनी पत्रपरिषदेत दिला.

टॅग्स :universityविद्यापीठ