शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईशिवाय एसटीच्या सेवेत रुजू हाेण्याची कर्मचाऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीतील बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. साेमवारपासून याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत. 

साेमवारी अर्ज वाढणार 

- एसटीने शुक्रवारी परिपत्रक काढले. शनिवार व रविवार आल्याने अपीलचे फारशे अर्ज आले नाहीत. बडतर्फ झालेल्यांचे ७ तर सेवा समाप्ती झालेल्यांचे २ अर्ज आले आहेत. त्यांच्यावर लवकरच निर्णय हाेणार आहे. साेमवारपासून अर्जांची संख्या वाढण्याची आहे. 

अशी आहे रुजू हाेण्याची प्रक्रिया - ज्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई झाली नाही. ते आगारप्रमुखाकडे साधा अर्ज करतील. त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

- ज्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे अपील करायचे आहे. याबाबतचा निर्णय समिती घेईल. मात्र कारवाई मागे घेण्याचे सरकारचे निर्देश असल्याने अपीलमध्ये कारवाई मागे घेतली जाणार आहे. 

एसटीच्या विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. न्यायालय जाे निकाल देईल ताे निकाल सर्वांनाच लागू असेल. त्यामुळे निकालाची वाट न बघता एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. सरकारच्या आदेशानुसार कारवाई मागे घेतली जाईल. -अशाेककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिराेली

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप